मुंबईतील १५० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक आणि कलेचा वारसा जपणारे संग्रहालय म्हणजे राणीच्या बागेतील डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालय..फोटो सौ : @ghalibkakhayal
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय १८५७ मध्ये पहिल्यांदा लोकांसाठी खुले करण्यात आले आणि ते मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे.फोटो सौ : @ghalibkakhayal
१८५१ मध्ये लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये होणाऱ्या पहिल्या 'ग्रेट एक्झिबिशन ऑफ द वर्क्स ऑफ इंडस्ट्री ऑफ ऑल नेशन्स'ची तयारी सुरू असताना १८५० मध्ये मुंबईत संग्रहालय उभारण्याची कल्पना प्रथम मांडण्यात आली. फोटो सौ : @ghalibkakhayal
१ नोव्हेंबर १९७५ रोजी, संग्रहालयाचे नामकरण डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय असे करण्यात आलेफोटो सौ : @svmke1
डॉ. भाऊ दाजी लाड हे पूर्वीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखले जायचे. या संग्रहालयाची इमारत मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे.फोटो सौ : @ghalibkakhayal
डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबईचे पहिले भारतीय इतिहासकार, चिकित्सक, शल्यचिकित्सक आणि संग्रहालय समितीचे सचिव होते.फोटो सौ : @Anuraag_Shukla
या संग्रहालयाला २००५ मध्ये 'युनेस्को'चा हेरिटेज कन्झर्व्हेशन पुरस्कार मिळाला आहे. हे संग्रहालय मार्च २०२३ मध्ये मुंबई महापालिकेने डागडुजीच्या कारणामुळे पर्यटकांसाठी बंद केले होते.फोटो सौ : @daksinapathpati
यावर्षी संग्रहालयाचे डागडुजीचे काम पूर्ण करून ८ जानेवारी २०२५ रोजी हे संग्रहालय पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.फोटो सौ : @ghalibkakhayal
या संग्रहालयात भारतीय कला, हस्तकला, सांस्कृतिक कला, आणि विविध प्रकाराच्या कला दर्शन घडवणारे संग्रह आहेत. तसेच ऐतिहासिक शिल्प, काचेचे दागिने, आणि पारंपारिक भारतीय कला यांचाही संग्रह आहे.फोटो सौ : @FPJ