आवळा हा अतिशय बहुगुणी आहे. आयुर्वेदात याचे मोठे महत्त्व सांगितले आहेत. विशेष करून त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवळा सर्वोत्तम आहे. तसेच दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी आवळ्याचे सेवन महत्त्वाचे मानले आहे. आवळा हा तुरट असल्याने अनेकांना तो खायला आवडत नाही. मात्र, आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ करून तुम्ही ते खाऊ शकता. आवळा उकळून खाऊ शकता.