एकटेच सहलीला निघतात ? ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

सोलो ट्रिप करायची. पण, सोलो ट्रिपचा अनुभव नसेल तर या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
एकटेच सहलीला निघतात ? ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
गेल्या काही काळापासून सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लोक बॅग भरून एकटेच सहलीला निघतात तर, काहींसोबत असं ही घडतं मित्रांसोबत केलेले प्लान अचानक कॅन्सल होतात आणि तेव्हा मनात विचार येतो चला आपण आता सोलो ट्रिप करायची. पण, सोलो ट्रिपचा अनुभव नसेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
 एकट्याने प्रवास करताना काही गोष्टी ह्या नेहमी लक्षात ठेवाव्यात.
गेल्या काही काळापासून सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लोक बॅग भरून एकटेच सहलीला निघतात तर, काहींसोबत असं ही घडतं मित्रांसोबत केलेले प्लान अचानक कॅन्सल होतात आणि तेव्हा मनात विचार येतो चला आपण आता सोलो ट्रिप करायची. पण, सोलो ट्रिपचा अनुभव नसेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकट्याने प्रवास करताना काही गोष्टी ह्या नेहमी लक्षात ठेवाव्यात.
सोलो ट्रिपची खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच प्रवास करण्याचा अनुभव खूपच रोमांचक असतो. पण काही लोक जे पहिल्यांदाच अशा ट्रिपला जात असतील, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जर तुम्हीही पहिल्यांदाच एकट्या सहलीचा प्लॅन करत असाल तर या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
सोलो ट्रिपची खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच प्रवास करण्याचा अनुभव खूपच रोमांचक असतो. पण काही लोक जे पहिल्यांदाच अशा ट्रिपला जात असतील, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जर तुम्हीही पहिल्यांदाच एकट्या सहलीचा प्लॅन करत असाल तर या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
ट्रिप प्लान करा- 

एकट्याने प्रवासाला निघण्यापूर्वी, शक्यतो कमी खर्चात प्लान पुर्ण करण्यावर भर द्या, आधी डेस्टीनेशन ठरवा. किती दिवस आपण तिकडे राहणार आहोत आणि प्रवास किती दिवसांचा असेल यावरून पुढचा प्लान ठरवा. त्यानंतर ठरवलेल्या डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी कुठला मार्ग सोपा आणि सहज असेल ते शोधा. सहलीदरम्यान-जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि येण्या-जाण्याचे भाडे, या सर्व खर्चाचा अंदाज काढून ठेवा. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत आहात त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. तिथले वातावरण, कनेक्टिव्हीटी या गोष्टी माहीत करून घ्या.
ट्रिप प्लान करा- एकट्याने प्रवासाला निघण्यापूर्वी, शक्यतो कमी खर्चात प्लान पुर्ण करण्यावर भर द्या, आधी डेस्टीनेशन ठरवा. किती दिवस आपण तिकडे राहणार आहोत आणि प्रवास किती दिवसांचा असेल यावरून पुढचा प्लान ठरवा. त्यानंतर ठरवलेल्या डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी कुठला मार्ग सोपा आणि सहज असेल ते शोधा. सहलीदरम्यान-जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि येण्या-जाण्याचे भाडे, या सर्व खर्चाचा अंदाज काढून ठेवा. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत आहात त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. तिथले वातावरण, कनेक्टिव्हीटी या गोष्टी माहीत करून घ्या.
हॉटेल बुक करा-  तमचे बजेट लक्षात घेऊन हॉटेल निवडा. यासाठी आधीच हॉटेल बुक करा. कमी बजेटचे हॉटेल बुक केले म्हणजे हॉटेल खराब होईलच असे नाही. लक्षात ठेवा की तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि हॉटेलमध्ये खूप कमी वेळ घालवायचा आहे, त्यामुळे आलिशान हॉटेल असण्याची गरज नाही.
हॉटेल बुक करा- तमचे बजेट लक्षात घेऊन हॉटेल निवडा. यासाठी आधीच हॉटेल बुक करा. कमी बजेटचे हॉटेल बुक केले म्हणजे हॉटेल खराब होईलच असे नाही. लक्षात ठेवा की तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि हॉटेलमध्ये खूप कमी वेळ घालवायचा आहे, त्यामुळे आलिशान हॉटेल असण्याची गरज नाही.
ओव्हरपॅकिंग नको-  

जर तुम्ही पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असलायला पाहिजे. बर्‍याच वेळा आपल्याकडे जास्त माहिती नसते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकट्याने प्रवास करताना, बरेच लोक खूप जास्त सामान बांधून घेतात, ज्यामुळे त्यांना सामान नेण्यात अधिक त्रास होतो. त्यामुळे गरजेपुरते सामान घ्या, ओव्हरपॅकिंग टाळा.

तुमच्या बॅगमध्ये या वस्तू ठेवा- प्रथमोपचार पेटी, ग्लुकोझ पावडर, चॉकलेट, स्नॅक्स, टॉर्च, 2 जॉगर, टि-शर्ट, पॉवर बॅक, शूज
ओव्हरपॅकिंग नको- जर तुम्ही पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असलायला पाहिजे. बर्‍याच वेळा आपल्याकडे जास्त माहिती नसते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकट्याने प्रवास करताना, बरेच लोक खूप जास्त सामान बांधून घेतात, ज्यामुळे त्यांना सामान नेण्यात अधिक त्रास होतो. त्यामुळे गरजेपुरते सामान घ्या, ओव्हरपॅकिंग टाळा. तुमच्या बॅगमध्ये या वस्तू ठेवा- प्रथमोपचार पेटी, ग्लुकोझ पावडर, चॉकलेट, स्नॅक्स, टॉर्च, 2 जॉगर, टि-शर्ट, पॉवर बॅक, शूज
फॅमिलीशी संपर्क कायम ठेवा

तुम्ही कुठे एकटे फिरायला जात असाल तर तुमच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात रहा. हे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते. यासोबतच तुमचा प्रवासाचा कार्यक्रम, तुम्ही कुठे जाणार आहात, ते सर्व तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा.
फॅमिलीशी संपर्क कायम ठेवा तुम्ही कुठे एकटे फिरायला जात असाल तर तुमच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात रहा. हे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते. यासोबतच तुमचा प्रवासाचा कार्यक्रम, तुम्ही कुठे जाणार आहात, ते सर्व तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा.
प्लान बी ठेवा रेडी-

कधीही एकट्याने प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. अशा वेळी प्लान-बी नेहमी तयार ठेवा. एखादं रिझर्व्हेशन कॅन्सल झालं किंवा ज्या जागी गेलात, ती जागा आवडली नाही, तर हातात दुसरा प्लान आणि ऑप्शन ठेवा. त्यामुळे तुमची ट्रीप खराब होणार नाही आणि तुमचा मूड-ऑफही होणार नाही.
प्लान बी ठेवा रेडी- कधीही एकट्याने प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. अशा वेळी प्लान-बी नेहमी तयार ठेवा. एखादं रिझर्व्हेशन कॅन्सल झालं किंवा ज्या जागी गेलात, ती जागा आवडली नाही, तर हातात दुसरा प्लान आणि ऑप्शन ठेवा. त्यामुळे तुमची ट्रीप खराब होणार नाही आणि तुमचा मूड-ऑफही होणार नाही.
logo
marathi.freepressjournal.in