महागडे प्रोटीन खाण्यापेक्षा घरी सहज उपलब्ध होणारे हे ९ पदार्थ खा..मिळतील भरपूर प्रथिने!

महागडे प्रोटीन खाण्यापेक्षा घरी सहज उपलब्ध होणारे हे ९ पदार्थ खा..मिळतील भरपूर प्रथिने!
Published on
दुधामध्ये उच्च प्रथिनांसोबत कॅल्शियम आणि इतर पोषणतत्त्वे असतात, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. रोज सकाळी  किंवा संध्याकाळी झोपताना एक ग्लास दूध पिल्याने तुमची प्रकृती निरोगी राहू शकते. दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटससुद्ध असतात. यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात.
दुधामध्ये उच्च प्रथिनांसोबत कॅल्शियम आणि इतर पोषणतत्त्वे असतात, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. रोज सकाळी किंवा संध्याकाळी झोपताना एक ग्लास दूध पिल्याने तुमची प्रकृती निरोगी राहू शकते. दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटससुद्ध असतात. यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात. फोेटो सौ : FPJ
पनीर हा पदार्थ एक उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे, पनीर शाकाहारी लोकांसाठी महत्त्वपूर्ण पदार्थ आहे, आणि याचा वापर विविध प्रकारच्या पदार्थात केला जाऊ शकतो. दुधापासून बनल्यामुळे पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. स्नायूंना मजबूत बनवण्यासाठी प्रथिनेही आवश्यक असतात, जे तुम्हाला पनीरमधून भरपूर प्रमाणात मिळू शकतात
पनीर हा पदार्थ एक उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे, पनीर शाकाहारी लोकांसाठी महत्त्वपूर्ण पदार्थ आहे, आणि याचा वापर विविध प्रकारच्या पदार्थात केला जाऊ शकतो. दुधापासून बनल्यामुळे पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. स्नायूंना मजबूत बनवण्यासाठी प्रथिनेही आवश्यक असतात, जे तुम्हाला पनीरमधून भरपूर प्रमाणात मिळू शकतात फोेटो सौ : FPJ
रोज अंडी खाणे हे शरीरासाठी खुप लाभदायी आहे. अंड्यातून उत्तम प्रकारचे  प्रथिने मिळतात, तूम्ही जिमला जात असाल तर रोज अंडी खाणे योग्य ठरेल. अंडी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. जगभरातील डॉक्टर आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात.
रोज अंडी खाणे हे शरीरासाठी खुप लाभदायी आहे. अंड्यातून उत्तम प्रकारचे प्रथिने मिळतात, तूम्ही जिमला जात असाल तर रोज अंडी खाणे योग्य ठरेल. अंडी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. जगभरातील डॉक्टर आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात. फोेटो सौ : FPJ
चण्यामध्ये फायबर्स आणि इतर पोषणतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. चण्याचा वापर रोजच्या जेवणात केला जाऊ शकतो. यात अधिक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे अधिक काळ भूक लागत नाही. 'ओव्हरइंटिंग' करण्यापासून तुम्ही थांबता आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये भिजवून किंवा उकडलेले चणे खाऊ शकता.
चण्यामध्ये फायबर्स आणि इतर पोषणतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. चण्याचा वापर रोजच्या जेवणात केला जाऊ शकतो. यात अधिक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे अधिक काळ भूक लागत नाही. 'ओव्हरइंटिंग' करण्यापासून तुम्ही थांबता आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये भिजवून किंवा उकडलेले चणे खाऊ शकता.फोेटो सौ : FPJ
पीनट बटरमध्ये आरोग्यदायी  जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी, झिंक, लोह, पोटॅशियम  जास्त असते. या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. पीनट बटरमध्ये प्रथिनं आणि हेल्दी फॅट्स असल्याने  शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही सँडविच आणि स्नॅक्ससोबत खाऊ शकता.
पीनट बटरमध्ये आरोग्यदायी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी, झिंक, लोह, पोटॅशियम जास्त असते. या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. पीनट बटरमध्ये प्रथिनं आणि हेल्दी फॅट्स असल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही सँडविच आणि स्नॅक्ससोबत खाऊ शकता. फोेटो सौ : FPJ
सोयाबीन खाणेही आरोग्यासाठी लाभदायी आहे. सोयाबीनमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले वाटते आणि वजन कमी करण्यात मदत होते.
सोयाबीन खाणेही आरोग्यासाठी लाभदायी आहे. सोयाबीनमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले वाटते आणि वजन कमी करण्यात मदत होते. फोेटो सौ : FPJ
तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषकतत्त्वांचा   खजिना म्हणजे 'दही'.  हा एक उत्तम पर्याय आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराची जाडी कमी करण्यासाठी दही उत्तम पर्याय आहे.  रोजच्या आहारात आपण दह्याचा वापर अनेक प्रकारे करू शकता.
तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषकतत्त्वांचा खजिना म्हणजे 'दही'. हा एक उत्तम पर्याय आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराची जाडी कमी करण्यासाठी दही उत्तम पर्याय आहे. रोजच्या आहारात आपण दह्याचा वापर अनेक प्रकारे करू शकता.फोेटो सौ : Free Pik
बदाम हे आरोग्यासाठी फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. बदाम खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, वजन नियंत्रित राहते, डोळ्यांच्या समस्या दूर होतात. बदाममध्ये व्हिटॅमिन-ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3 असते. रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने स्मरणशक्ती वाढते.
बदाम हे आरोग्यासाठी फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. बदाम खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, वजन नियंत्रित राहते, डोळ्यांच्या समस्या दूर होतात. बदाममध्ये व्हिटॅमिन-ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3 असते. रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने स्मरणशक्ती वाढते.फोेटो सौ : FPJ
पचन संस्था चांगली बनविण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तंतुमय पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये तुरीच्या डाळीचा समावेश असावा. पचनयोग्य तंतुमय पदार्थांसाठी आणि निरोगी आहारासाठी तुरीची डाळ चांगली असते.
 (Disclaimer:  या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )
पचन संस्था चांगली बनविण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तंतुमय पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये तुरीच्या डाळीचा समावेश असावा. पचनयोग्य तंतुमय पदार्थांसाठी आणि निरोगी आहारासाठी तुरीची डाळ चांगली असते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )फोेटो सौ : FPJ
logo
marathi.freepressjournal.in