क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा विवाहसोहळा पार पडला. खंडाळ्यातील फार्म हाऊसमध्ये दोघांचे लग्न झाले
सुनील शेट्टी आणि मुलगा अहान शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई वाटून अथियाच्या लग्नाची माहिती दिली. यावेळी सुनील शेट्टीने कुर्ता आणि पारंपरिक दागिने घातले होते.
फार्म हाऊसबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाले, “हा खूप सुंदर आणि छोटासा सोहळा होता. कुटुंबातील अनेक जवळचे सदस्य उपस्थित होते.
अहान पांढऱ्या पारंपारिक कपड्यांमध्ये दिसला. अहानने मिठाई वाटली आणि नंतर पालकांनी फोटोसाठी पोज दिली.
सुनील शेट्टी म्हणाले की, आयपीएलनंतर त्याचे रिसेप्शन होणार आहे
फोटो साभार : विरल भयानी