९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: समारोप कार्यक्रमामध्ये मराठी साहित्य मंडळाच्यावतीने १२ ठराव

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: समारोप कार्यक्रमामध्ये मराठी साहित्य मंडळाच्यावतीने १२ ठराव
एक्स @MahaGovtMic
Published on

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून ९८व्या संमेलनापर्यंत ज्या मान्यवर व्यक्तींचे निधन झाले, त्या सर्वांना संमेलन श्रद्धांजली वाहते. ९६व्या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आणि साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष रा. र. बोराडे यांना श्रद्धांजली.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून ९८व्या संमेलनापर्यंत ज्या मान्यवर व्यक्तींचे निधन झाले, त्या सर्वांना संमेलन श्रद्धांजली वाहते. ९६व्या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आणि साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष रा. र. बोराडे यांना श्रद्धांजली. एक्स @MahaGovtMic
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्याचा ठराव मांडण्यात आला. तसेच वादग्रस्त सीमा भागावर केंद्र सरकारने तत्काळ तोडगा काढण्याचा मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. यासह १२ ठराव या संमेलनाच्या निमित्ताने मांडण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्याचा ठराव मांडण्यात आला. तसेच वादग्रस्त सीमा भागावर केंद्र सरकारने तत्काळ तोडगा काढण्याचा मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. यासह १२ ठराव या संमेलनाच्या निमित्ताने मांडण्यात आले. एक्स @MahaGovtMic
महामंडळाच्या बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांचे विस्तृत कार्यक्षेत्र लक्षात घेऊन या संस्थांना विशेष दर्जा देत वार्षिक अर्थसहाय्य मंजूर करावे.
महामंडळाच्या बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांचे विस्तृत कार्यक्षेत्र लक्षात घेऊन या संस्थांना विशेष दर्जा देत वार्षिक अर्थसहाय्य मंजूर करावे. एक्स @MahaGovtMic

शासनाने गावागावातील ग्रंथालयांना उर्जितावस्था यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे.
शासनाने गावागावातील ग्रंथालयांना उर्जितावस्था यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे.एक्स @MahaGovtMic
मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा. तो सध्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो.
मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा. तो सध्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो. एक्स @MahaGovtMic
महाराष्ट्र शासनाने रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली; मात्र, अद्याप यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्यात आलेले नाही. तरी विद्यापीठाचे कामकाज नियमित सुरू करण्यासाठी शासनाने आवश्यक तेवढा उपलब्ध निधी उपलब्ध करून द्यावा. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि विद्यापीठाचे कामकाज विना विलंब सुरू करण्यात यावे.
महाराष्ट्र शासनाने रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली; मात्र, अद्याप यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्यात आलेले नाही. तरी विद्यापीठाचे कामकाज नियमित सुरू करण्यासाठी शासनाने आवश्यक तेवढा उपलब्ध निधी उपलब्ध करून द्यावा. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि विद्यापीठाचे कामकाज विना विलंब सुरू करण्यात यावे. एक्स @MahaGovtMic
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मराठी भाषेचे अध्यासन केंद्र तातडीने सुरू करावे. त्यासाठी भारत सरकारने आवश्यक ते सर्व सहकार्य करावे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मराठी भाषेचे अध्यासन केंद्र तातडीने सुरू करावे. त्यासाठी भारत सरकारने आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. एक्स @MahaGovtMic
गेल्या ६८ वर्षांपासून महाराष्ट्र सीमेवरील ८६५ गावांतील सुमारे २५ ते ३० लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. तसेच २० वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी दावा प्रलंबित आहे. ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. यावर केंद्र शासनाने वादग्रस्त सीमा भागाला तत्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्याचा तोडगा करावा, अशी मागणी ९८ अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात आला.
गेल्या ६८ वर्षांपासून महाराष्ट्र सीमेवरील ८६५ गावांतील सुमारे २५ ते ३० लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. तसेच २० वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी दावा प्रलंबित आहे. ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. यावर केंद्र शासनाने वादग्रस्त सीमा भागाला तत्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्याचा तोडगा करावा, अशी मागणी ९८ अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात आला. एक्स @MahaGovtMic
महाराष्ट्रातील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये त्या भागातील बोली भाषांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात यावा. यामुळे बोलीभाषांच्या संवर्धन होईल. संत गाडगेबाबा यांची जयंती म्हणजे २३ फेब्रुवारी हा दिवस मराठी बोलीभाषा दिन म्हणून साजरा करावा.
महाराष्ट्रातील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये त्या भागातील बोली भाषांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात यावा. यामुळे बोलीभाषांच्या संवर्धन होईल. संत गाडगेबाबा यांची जयंती म्हणजे २३ फेब्रुवारी हा दिवस मराठी बोलीभाषा दिन म्हणून साजरा करावा. एक्स @MahaGovtMic
महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांचे मृत्यू, स्त्रियांवरील अत्याचार ही परिस्थिती चिंताजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने परिणामकारक कृतीची, कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची आणि गुन्हेगारी मोडून काढण्याची नितांत गरज आहे.
महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांचे मृत्यू, स्त्रियांवरील अत्याचार ही परिस्थिती चिंताजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने परिणामकारक कृतीची, कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची आणि गुन्हेगारी मोडून काढण्याची नितांत गरज आहे.एक्स @MahaGovtMic
गोव्यात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत कोकणी भाषा अनिवार्य करणे म्हणजे मराठीला टाळणे होय, हे अन्यायकारक आहे. एकांगी निर्णयाने होणारी हानी ही केवळ मराठी भाषेचे नसून ती गोव्याच्या संस्कृतीची, शिक्षणाची आणि प्रगतीची आहे. केंद्र सरकारने मराठीवरील अन्याय दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
गोव्यात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत कोकणी भाषा अनिवार्य करणे म्हणजे मराठीला टाळणे होय, हे अन्यायकारक आहे. एकांगी निर्णयाने होणारी हानी ही केवळ मराठी भाषेचे नसून ती गोव्याच्या संस्कृतीची, शिक्षणाची आणि प्रगतीची आहे. केंद्र सरकारने मराठीवरील अन्याय दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. एक्स @MahaGovtMic
logo
marathi.freepressjournal.in