काळ बदलतो तसं आपल्याला मुलांचे संगोपन करताना स्वतःला सुद्धा बदलावं लागतं. मुलांचे चुकल्यावर त्यांना लगेच रागवणे किंवा चांगलं केल्यावर लगेच गिफ्ट देणे यापेक्षा अन्य प्रकारे मुलांना कसे समजून सांगता येईल यावर भर द्या. यासाठी या काही खास टिप्स-
लहान मुलांना खाऊ घालणे हे अक्षरशः कर्मकठीण असते. मात्र, अशा वेळी त्यांच्या सोबत बसून एकत्र जेवण करणे जास्त योग्य असते. त्यांना जेवण करणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून द्यायला हवे. मग मुलं आनंदाने जेवतात.