वातावरणातील बदलामुळे तुम्ही ही सतत आजारी पडताय का? सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय आणि घसाही वारंवार खराब होतोय. अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी या सगळ्या त्रासाचा कंटाळा येतो! थंडीच्या दिवसांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, शिंका येतात. सध्या वातावरणातील बदलामुळे रुग्णांची संख्या ही वाढली आहे.
खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे तसेच वेगवेगळ्या कारणामुळे घसा खवखवतो.
आवाजातल्या कर्कशपणामुळे काही विशेष त्रास होत नसला तरी बोलताना आणि ऐकण्यात अडचण येते. वारंवार खोकल्याने कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या सहकाऱ्यांनाही याचा त्रास होऊ शकतो.
आवाज दीर्घकाळ कर्कश राहिल्याने घशात जळजळ होते. खूप थंड पदार्थ खाल्ल्याने विशेषतः हिवाळ्यात ही समस्या उद्भवते. या सर्व समस्यांना दूर करण्याची काही घरगूती उपाय तुम्हाला लाभदायक ठरतील. ज्यामुळे घशाला तात्काळ आराम मिळेल.