प्रसिद्ध गायक सनम पुरीने लग्नगाठ बांधली आहे. सनम त्याची गर्लफ्रेंड झुचोबेनी तुंगोईसह लग्नबंधनात अडकला. दोघांचे लग्न नागालँडमध्ये झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
नागालँडमध्ये त्यांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले होते. सनम आणि जुचोबेनी यांनी त्यांचे लग्न अतिशय खाजगीत आणि साध्या पद्धतीने झाले.
जुचोबेनी तुंगो आणि सनम पुरी यांच्यात ६ वर्षांचा फरक आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
जुचोबेनी तुंगो आणि सनम पुरी यांनी आपल्या नात्याला नाव दिले आहे. सनम पुरीच्या फॅन पेजवरून लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
सनम आणि जुचोबेनी यांच्या लग्नाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थीत लग्न करताना दिसत आहेत.