यशचं संपूर्ण नाव नवीनकुमार गौडा असे आहे. तो एक कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. २००८ मध्ये मोगिना मनासू या कानडी चित्रपटातून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'राधिका' हा त्याचा दुसरा चित्रपट होता.
यशचे तसे खूप चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत परंतु kgf हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. यशाच्या लूक त्या नंतर खूप प्रसिद्ध झाला होता.
आज त्याचा रॉकी भाईचा वाढदिवस आहे. यश आज ३७ वर्षांचा झाला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्याला शुभेच्या दिल्या आहेत.
यश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो सध्या त्याच्या चित्रपटाच्या सूटिंगमध्ये बिझी आहे. प्रेक्षकांना त्याच्या आगामी चित्रपटाची फार उसुक्ता लागली आहे.