चकोल्या किंंवा वरणफळ हा सकाळी झटपट होणारा नाश्ता आहे. विशेष करून तुरीच्या डाळीत बनवला जाणारा हा पदार्थ आहे. मात्र मुगाच्या डाळीचे किंवा मिक्स डाळींच्या वरणातही हा पदार्थ करता येतो. हा पौष्टिक असून जीभेला उत्तम चव आणतो. गव्हाच्या पीठाच्या चपात्या लाटून त्याच्या छोट्या कापण्या वरणात उकळून त्याला फोडणी देऊन हा पदार्थ बनवता येतो. You Tube Video Ruchkar Mejwani