हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. हल्ली अगदीच तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपणे त्याची काळजी घेणे हे गरजेचे झाले आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे जाणून घेऊन त्वरित उपाय केल्यास मृत्यूचा धोका टळू शकतो.
हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होतात.
हृदय खूप जोरजोरात धडधडायला लागते.
तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो.
हात-पाय, मान, पाठ, कंबर यांच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना व्हायला लागतात.
तुम्हाला गुदमरल्यासारखे होते आणि जीव घाबरल्यासारखा होतो.