आपल्या लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण त्यांच्याकडून विविध प्रकारचे टास्क करून घेऊ शकतो, किंवा त्यांना आवडणारे काहीतरी त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. यासाठी पुढील माहिती वाचा.फोटो सौ : Meta AI
वाचनाची सवय लावा : मुलांना रोज काहीतरी वाचण्याची सवय लावा. वाचन त्यांच्या स्मृतीला चालना देते आणि त्यांना नवीन गोष्टी शिकायला मदत होते.फोटो सौ : Meta AI
स्मरणशक्तीचा व्यायाम :
मुलांना वेगवेगळ्या गोष्टीं आठवण करून सांगितल्या जाऊ शकतात. उदा, एक वाक्य सांगा आणि त्याचे तीन किंवा चार भाग सांगून त्यांना ते पुन्हा बोलायला सांगा.फोटो सौ : Meta AI
सकारात्मक वातावरण तयार करा : घरात सकारात्मक आणि शांत वातावरण ठेवा. तणाव कमी असेल तर मुलांचे लक्ष आणि स्मरणशक्ती उत्तम राहते.फोटो सौ : Meta AI
मुलांना त्यांच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्याची संधी द्या. विविध विषयांवर चर्चा केल्याने त्यांची स्मृती आणि विचारशक्ती सुधारते.फोटो सौ : Meta AI
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खेळ : कॉर्नर टू कॉर्नर किंवा पझल सारखे खेळ मुलांची स्मृती वाढवतात. हे खेळ मुलांच्या लक्ष आणि एकाग्रतेला चालना देतात.फोटो सौ : Meta AI
मुलांना निसर्गामध्ये फिरायला घेऊन जा आणि त्यांनी पाहिलेल्या गोष्टींचे वर्णन करण्यास सांगा. यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती वाढते आणि स्मरणशक्तीही सुधारते.फोटो सौ : Meta AI
मुलांना दररोज काय शिकवाल त्याचे पुनरावलोकन करण्यास सांगा. यामुळे नवीन गोष्टी आठवण्याची क्षमता वाढते आणि माहिती दीर्घकाळ लक्षात राहते.फोटो सौ : Meta AI
संगीत : मुलांना संगीत ऐकायला द्या. संगीत शारिरीक आणि मानसिक ताण कमी करते आणि मेंदूला सक्रिय ठेवते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.फोटो सौ : Meta AI