लहान मुलांना शार्प बनवायचे आहे? रोजच्या आहारात 'हे' पदार्थ नक्की द्या

प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांना हुशार आणि चपळ बनवायचे असते. त्यासाठी लहानापासूनच मुलांच्या आहाराकडे लक्ष्य देणे महत्वाचे आहे.
लहान मुलांना शार्प बनवायचे आहे? रोजच्या आहारात 'हे' पदार्थ नक्की द्या
फोटो सौ : free Pik
Published on

प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांना हुशार आणि चपळ बनवायचे असते. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांच्या आहाराकडे लक्ष्य देणे महत्त्वाचे आहे. योग्य आणि संतुलित आहारामुळे शारिरीक तसेच मानसिक आरोग्यावर पण तितकाच परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या मुलांना लहानापासून योग्य आहार देणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढे दिलेले माहिती नक्की वाचा.

डाळी आणि कडधान्ये मुलांसाठी एक उत्तम आहार आहे. कारण त्यामध्ये प्रोटीन, आयर्न आणि अन्य आवश्यक पोषक तत्त्वे असतात, जी मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाची आहेत.

फोटो सौ : free Pik

केळं मुलांसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये पोटॅशियम, विटामिन B6 आणि फोलेटचे प्रमाण चांगले असते, जे मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर ठरते.

फोटो सौ : free Pik

बदाम, अक्रोड, काजू, यांसारखे ड्राय फ्रूट्स मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी उत्तम आहेत. या पदार्थांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि प्रोटीन असते, जे मुलांच्या मेंदूच्या विकासाला चालना देतात.

फोटो सौ : free Pik

गाजर मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजरात असलेला बीटा-कॅरोटीन मुलांच्या मेंदूच्या कार्यासाठी उपयोगी ठरतो. गाजरामुळे डोळ्यांचे देखील आरोग्य उत्तम राहते.

फोटो सौ : free Pik

पालेभाज्या खाल्याने मुलांचे आरोग्य सुधारते तसेच मेंदूचा विकास देखील चांगल्या प्रमाणात होतो. कारण, पालेभाज्यामधून आयर्न, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळतात.

फोटो सौ : free Pik

या सर्व अन्न पदार्थांचे योग्य आणि संतुलित आहार सेवन केल्यास मुलांचा मेंदू अधिक तीव्र, आणि बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे घडू शकतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in