२ मूलांक असलेला जोडीदार तुमच्यासाठी योग्य ठरेल का? जाणून घ्या यांची वैशिष्ट्ये

All Photo Freepik
Published on
आपल्यासाठी जोडीदार निवडताना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्ही अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्य समजून मग जोडीदाराची निवड करू शकता.  अंकशास्त्रानुसार जन्मतारखेची बेरीज करून मूलांक काढला जातो. या अंकांचा व्यक्तीवर प्रभाव असतो.  २ मूलांक असलेली व्यक्ती शांत आणि संयमी असते. त्यांच्यात सहनशीलता हा आणखी एक गुण असतो.

या व्यक्ती तुमचे खूप चांगले मित्र तसेच मैत्रीण होऊ शकतात. हे  आपल्या मित्रांसाठी वेळप्रसंगी काहीही तयार करण्यास तयार असतात.

चंद्र या मुलांकाच्या व्यक्तींचा कारक ग्रह असतो. त्यामुळे या व्यक्ती खूप क्रिएटिव्ह असतात. त्यामुळे त्यांची वैचारिक क्षमता खूप उत्तम असते. त्यांच्या डोक्यात कायमच काही ना काही नवीन कल्पना असतात.

कलात्मक सौंदर्य जपण्यात या व्यक्ती खूप अग्रेसर असतात. यांना घराची सजावट, पेटिंग, चित्रकला तसेच कला क्षेत्राशी निगडित गोष्टीत खूप रस असतो. हे लोक घर खूप छान सुंदर ठेवतात.

मात्र, या व्यक्ती अनेक वेळा गोंधळात असतात. यांच्या आयुष्यात भ्रम खूप असतात.

या व्यक्ती खूप स्वप्नाळू असतात. कायम स्वप्न पाहत राहतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. कारण अति स्वप्नाळू स्वभावामुळे प्रत्यक्ष व्यावहारिकपणा त्यांच्यात कमी असतो.

खूप जास्त भावनिक असल्यामुळे यांचा भावनिक गुंता खूप मोठा असतो. तसेच या कोणत्याही नातेसंबंधात खूप जास्त इनव्हॉल्व्ह होतात. मात्र, असे असले तरी या शांत, संयमी आणि भावनिक असल्यामुळे तुमच्या भावना ते लगेच समजून घेऊ शकतात. तसेच या व्यक्ती समजूतदार असल्याने नातेसंबंध टिकून राहतात.

या व्यक्ती वाईट प्रसंगांमध्ये आपला जोडीदार, मित्र, नातेवाईक यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतात. 

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
या व्यक्ती वाईट प्रसंगांमध्ये आपला जोडीदार, मित्र, नातेवाईक यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतात. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
logo
marathi.freepressjournal.in