ऑगस्टमध्ये १,४३ लाख कोटी जीएसटी संकलन

आर्थिक सुधारणांसह जीएसटीच्या चांगल्या अहवालामुळे जीएसटी महसुलात सकारात्मक वाढ झाली आहे.
ऑगस्टमध्ये १,४३ लाख कोटी जीएसटी संकलन

यंदा ऑगस्टमध्ये १,४३,६१२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २८ टक्के अधिक आहे. सलग सहाव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४० लाख कोटींहून अधिक झाले आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती जाहीर केली.

अर्थ मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक सुधारणांसह जीएसटीच्या चांगल्या अहवालामुळे जीएसटी महसुलात सकारात्मक वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये एकत्रित जीएसटी महसूल १,४३,६१२ कोटी रुपये होता. त्यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) रुपये २४,७१० कोटी, राज्य जीएसटी (एसजीएसटी) रुपये ३०,९५१ कोटी आहे.

एकात्मिक जीएसटीच्या रूपात ७७,७८२ कोटी रुपयांचे संकलन झाले असून त्यापैकी ४२,०६७ कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर कर म्हणून जमा झाले आहेत. त्याच वेळी, ऑगस्ट महिन्यात उपकर म्हणून १०,१६८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात तब्बल २८ टक्के वाढ झाली आहेगेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जीएसटी महसूल म्हणून १,१२,०२० कोटी रुपयांचे संकलन झाले होते.

अनेक वस्तू, सेवा जीएसटी कक्षेत आणल्याने संकलन वाढले

अलीकडे, जीएसटी परिषदेने अशा अनेक उत्पादनांवर आणि सेवांवर वस्तू आणि सेवा कर लागू केला आहे. अनेक वस्तू आणि सेवा जीएसटीच्या कर कक्षात आणल्या. त्यावर आता जीएसटी आकारण्या येत आहे. त्याचा ही परिणाम कर संकलनात दिसून येतो. हॉटेलचे भाडे, खासगी रुग्णालयातील ५ हजार रुपयांपेक्षा जास्त एसी रुम यावर जीएसटीचा आकार लागू असेल. एवढेच नाही तर त्यातही १२ते १८ टक्क्यांची श्रेणी आहे. त्यानुसार ग्राहकांना जीएसटी द्यावा लागणार आहे. पॅक, सीलबंद खाद्यपदार्थांवरही ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

जीएसटी परिषदेने मागील बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाचं हे फलित आहे. अर्थव्यवस्था सावरत असल्याचा सकारात्मक परिणाम सातत्याने जीएसटी संकलनावर दिसून येत आहे,” असं सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in