बाबरकडे पुन्हा पाकिस्तानचे कर्णधारपद

एकदिवसीय विश्वचषकातील अपयशानंतर बाबरने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शाहीन आफ्रिदीकडे टी-२० संघाचे, तर शान मसुदकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
बाबरकडे पुन्हा पाकिस्तानचे कर्णधारपद

लाहोर : २९ वर्षीय बाबर आझमची रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकात बाबरच पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवताना दिसेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) स्पष्ट केले.

एकदिवसीय विश्वचषकातील अपयशानंतर बाबरने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शाहीन आफ्रिदीकडे टी-२० संघाचे, तर शान मसुदकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र न्यूझीलंड तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर पीसीबीने पुन्हा एकदा बाबरला कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली. तसेच पीसीबीचे नवे अध्यक्ष मोहसिन नाकवी यांनी संघात काही आमुलाग्र बदल करण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे आता आफ्रिदीची टी-२० व एकदिवसीय प्रकाराच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करत पुन्हा एकदा बाबरकडे धुरा सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in