एलोर्डो कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ४ भारतीयांचा प्रवेश

बॉक्सरविरुध्द शानदार प्रदर्शन करताना ५४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सर्वसहमतीच्या निर्णयावर विजय मिळविला.
एलोर्डो कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ४ भारतीयांचा प्रवेश

विश्व चॅम्पियनशिपची कांस्य पदक विजेती जमुना बोराने रविवारी कजाखस्तानच्या अनेल साकिशला नमवून कजाखस्तानच्या नूर सुल्तान येथे सुरू असलेल्या एलोर्डो कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जमुनाबरोबरच तीन अन्य भारतीय बॉक्सर कलाइवानी श्रीनिवासन (४८ किलो), गितिका (४८ किलो ) आणि अल्फिया (५४ किलोपेक्षा अधिक) यांनीही अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरी सोमवारी होणार आहे.

आसामच्या जमुनाने स्थानिक बॉक्सरविरुध्द शानदार प्रदर्शन करताना ५४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सर्वसहमतीच्या निर्णयावर विजय मिळविला. जमुनाने गती आणि फुटवर्क याच्या जोरावर अनेलवर वर्चस्व मिळविले.

अन्य दोन बॉक्सर साक्षी (५४ किलो ) आणि सोनिया (५७ किलो) यांना उपांत्य फेरीत उज्बेकिस्तानच्या निगिना उकतामोवा आणि सितोरा तुर्दिबेकोवा यांच्याकडून अनुक्रमे ०-५ आणि २-३ असा पराभव पत्कारावा लागला.

दरम्यान, पुरुष गटात चार भारतीय बॉक्सरना उपांत्य फेरीत सर्वसहमीच्या निर्णयावर पराभव स्वीकारावा लागला.

कुलदीप (४८ किलो) आणि जुगनू (९२ किलो) यांना कजाखस्तानचे असिलबेक जेलिलोव आणि एबेक ओरलबेने नमविले. अनंतला चीनच्या फैंग बोने पराजित केले.

सचिनने (५७ किलो) ने २०२१ विश्व चॅम्पियनशिपचा रौप्य पदक विजेता कजाखस्तानचा सेरिक तेमिरझानोव याला कडवी लढत दिली; पण त्याचा पराभव झाला.

एलोर्डा कप टूर्नामेंटमध्ये भारत, उज्बेकिस्तान, यजमान कजाखस्तान, क्यूबा, चीन आणि मंगोलिया हे देश सहभागी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in