विम्बल्डन विजेत्यांवर ४६४ कोटींची खैरात

पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्यांना मिळणार प्रत्येकी २४ कोटी
विम्बल्डन विजेत्यांवर ४६४ कोटींची खैरात

लंडन : चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत विक्रमी वाढ करण्यात आली आहे. यंदा एकूण ४६४ कोटींची (४४.६ मिलियन पाऊंड) खैरात करण्यात येणार असून महिला व पुरुष एकेरीच्या विजेत्याला प्रत्येकी २४ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
३ जुलैपासून यंदा विम्बल्डनला सुरुवात होणार असून रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्या अनुपस्थितीत साहजिकच गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला पुरुषांमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत इगा स्विआटेक, आर्यना सबालेंका यांचे पारडे जड आहे. यंदा या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ११.२ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

पात्रता फेरीत खेळणाऱ्या तसेच मुख्य फेरीत पात्र ठरलेल्या खेळाडूंनाही भरघोस रक्कम देण्यात येणार आहे. पहिल्याच फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी १ कोटी देण्यात येईल. त्यानंतर जसजसा खेळाडू जिंकत जाईल, त्याला मिळणारी बक्षिसाची किंमत वाढत जाईल. २०२०मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २०२१मध्ये कोरोनामुळे बक्षीस रकमेतही घट झाली. गतवर्षी मात्र स्पर्धा चाहत्यांच्या साक्षीने पुन्हा सुरू झाली व बक्षीस रक्कमही वाढली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in