रोहित शर्मावर ५० कोटींची बोली? विकत घेण्यासाठी दिल्ली, लखनौ उत्सुक

आयपीएल २०२५ मोसमासाठी मेगालिलाव यंदा रंगणार आहे. मात्र त्याची चर्चा आतापासूनच सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून डच्चू दिलेल्या रोहित शर्माला विकत घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक आहेत. त्यामुळे त्याच्यावर ५० कोटींपेक्षा जास्त बोली लागेल, अशी चर्चा आहे.
रोहित शर्मावर ५० कोटींची बोली? विकत घेण्यासाठी दिल्ली, लखनौ उत्सुक
Published on

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ मोसमासाठी मेगालिलाव यंदा रंगणार आहे. मात्र त्याची चर्चा आतापासूनच सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून डच्चू दिलेल्या रोहित शर्माला विकत घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक आहेत. त्यामुळे त्याच्यावर ५० कोटींपेक्षा जास्त बोली लागेल, अशी चर्चा आहे.

रोहितने मुंबई इंडियन्सला आयपीएलची ५ जेतेपदे जिंकून दिली. मात्र मुंबईसोबत आता रोहित समाधानी नाही. पंजाब किंग्सने रोहित आपला कर्णधार व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र मालकीण प्रीती झिंटा यांनी याबाबत नकार दिला आहे. कर्णधारपदावरून डच्चू मिळाल्यानंतर रोहितशी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने संपर्क साधला होता, मात्र त्यावेळी कराराला मूर्त रूप मिळाले नाही. मात्र आता होणाऱ्या मेगालिलावात रोहितला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने कंबर कसली असून त्यासाठी ते ५० कोटी रक्कम मोजायलाही तयार आहेत.

मेगालिलावात सहभागी होणार की नाही, याचे आश्वासन रोहित शर्माकडून लखनौ आणि दिल्ली संघाला हवे आहे. रोहित शर्मा लिलावात उतरल्यास, त्याला खरेदी करण्यासाठी निम्मी रक्कम खर्च करण्याची तयारी दिल्ली, लखनौने ठेवली आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद मिळवता आले नसले तरी रोहित शर्मासारख्या सर्वात यशस्वी कर्णधाराला आपल्याकडे विकत घेण्यासाठी त्यांच्यामध्ये चांगलीच शर्यत रंगणार आहे.

ऋषभ पंत, लोकेश राहुलला डच्चू?

रोहितला आपल्याकडे विकत घेण्यासाठी दोन्ही संघांनी तयारी दर्शवली तर ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांचे काय होणार, हा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन पंतच्या कामगिरीवर नाखूश आहे. मात्र त्यांचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीच्या मते, पंत हा २०२५च्या मोसमात दिल्लीकडून खेळणार आहे. राहुलने लखनौचे मालक संजीव गोएंका यांच्याशी सार्वजनिक ठिकाणी पंगा घेतला होता. त्यामुळे स्वत: तो लखनौ संघातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावात मिचेल स्टार्कच्या (२४.७५ कोटी) नावावर असलेला सर्वाधिक बोलीचा विक्रम यंदा मोडीत निघणार, अशी दाट शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in