संदीप, प्रशांत, नीलम, काजल उपांत्य फेरीत दाखल

पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत विश्वविजेत्या मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने पुण्याचा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू प्रकाश गायकवाडवर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळविला.
संदीप, प्रशांत, नीलम, काजल उपांत्य फेरीत दाखल

मंडपेश्वर सिविक फेडरेशनच्या वतीने बोरिवली येथे सुरु असलेल्या आठव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, प्रशांत मोरे, नीलम घोडके, काजल कुमारी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत विश्वविजेत्या मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने पुण्याचा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू प्रकाश गायकवाडवर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळविला. माजी विश्वविजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने मात्र आपला सामना जिंकताना मुंबईच्या संदीप देवरूखकवर २५-२१, २५-१८ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

महिलांच्या उपउपांत्य सामन्यात ठाण्याच्या उदयोन्मुख समृद्धी घाडिगावकरने विश्व् क्रमांक ३ असलेल्या मुंबईच्या निलम घोडकेला अखेरपर्यंत झुंजविले. मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर निलमने हा सामना २५-६, ५-२५ व १७-१४ असा खिशात घातला. दुसऱ्या उपउपांत्य लढतीत माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या काजल कुमारीने मुंबईच्या होतकरू सेजल लोखंडेवर २५-६, २५-१७ अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल

महम्मद घुफ्रान (मुंबई) वि वि अभिजित त्रीपनकार (पुणे) ११-१९, २५-५, २५-११

झैद अहमद फारुकी (ठाणे) वि वि सिद्धांत वाडवलकर (मुंबई) १९-४, २५-१२.

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल

अंबिका हरिथ (मुंबई) वि वि ऐशा साजिद खान (मुंबई) ८-२४, २५-२१, २५-५.

मिताली पाठक (मुंबई) वि वि आकांक्षा कदम (रत्नागिरी) २५-१२, २३-११.

logo
marathi.freepressjournal.in