भारताला मोठा धक्का;जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर जाण्याची शक्यता

शस्त्रक्रियेनंतर त्याला अनिश्चित काळासाठी आराम करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताला मोठा धक्का;जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर जाण्याची शक्यता

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झालेली असून त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याला अनिश्चित काळासाठी आराम करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जडेजावर शस्त्रक्रिया होणार असल्याने तो फक्त आशिया कपमधील उर्वरित सामन्यासाठीच नव्हे तर आगामी टी-२० वर्ल्डकपलादेखील मुकणार आहे. टी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारताचादेखील समावेश आहे. जडेजा संघाबाहेर झाल्याने संघाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in