भारतीय महिला हॉकी संघाला मोठा धक्का, 'या' स्टार महिला खेळाडूला कोरोनाची लागण

कॉमनवेल्थ गेम्ससाठी बर्मिंगहॅमला पोहोचल्यानंतर भारतीय हॉकीलसंघात कोरोना संसर्गाची ही पहिलीच घटना ठरली
भारतीय महिला हॉकी संघाला मोठा धक्का, 'या' स्टार महिला खेळाडूला कोरोनाची लागण

राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाला मोठा धक्का बसला. संघाची स्टार खेळाडू नवज्योत कौर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शनिवारी टीमची अनुभवी खेळाडू नवज्योत कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे ती वेल्सबरोबरच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर झाली.

नवज्योतला संसर्ग झाल्यामुळे रविवारी ३१ जुलै रोजी मायदेशात परतणार आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठी बर्मिंगहॅमला पोहोचल्यानंतर भारतीय हॉकीलसंघात कोरोना संसर्गाची ही पहिलीच घटना ठरली. येथे येण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघातील पूजा वस्त्राकर आणि एस मेघना या दोन सदस्यांना संसर्ग झाला होता. आता दोघेही फिट आहेत. मेघना संघात सामील झाली असून ३ ऑगस्ट रोजी बार्बाडोसविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी पूजा संघात सामील होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in