बांग्लादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेआधी भारताला झटका, 'हा' मुख्य खेळाडू स्पर्धेबाहेर

तो सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तीन सामन्यांच्या मालिकेत तो भाग घेऊ शकणार नाही
बांग्लादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेआधी भारताला झटका, 'हा' मुख्य खेळाडू स्पर्धेबाहेर

भारत आणि बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात रविवारपासून (४ डिसेंबर) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. जसप्रती बुमराहच्या अनुपस्थित गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. एकदिवसीय मालिकेतून तो बाहेर पडल्याने भारताच्या चिंतेत भर पडू शकते. "बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी सराव सत्रादरम्यान मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तीन सामन्यांच्या मालिकेत तो भाग घेऊ शकणार नाही.

असा असेल बांगलादेशचा संघ : 
तमिम (कर्णधार), लियॉन, इनामुल, शकीब, मुशफिकुर, अफिफा, यासिर अली, मेहिदी, मुस्तफिझूर, तस्किन, हसन महमूद, इबादत, नसुम, महमुदुल्ला, शांतो आणि नुरुल हसन. 

असा असेल भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in