दीप्ती शर्माने केलेले रनआऊट योग्य; एमसीसीचा निर्वाळा

४७ धावांवर खेळणारी इंग्लंडची फलंदाज चार्ली क्रीज ओव्हरटेक करताना दिप्तीने रनआऊट केले
दीप्ती शर्माने केलेले रनआऊट योग्य; एमसीसीचा निर्वाळा

भारतीय खेळाडू दीप्ती शर्माने चार्ली डीनला केलेले रनआऊट योग्य असल्याचा निर्वाळा मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) दिला. त्यामुळे दीप्तीच्या कृतीला क्रिकेटचे नियम बनविणाऱ्या संस्थेकडून मान्यतेची मोहोर उमटली.

क्रिकेटच्या कायद्याच्या संरक्षकांनी दीप्तीच्या रनआऊटला वैध ठरविले. ४७ धावांवर खेळणारी इंग्लंडची फलंदाज चार्ली क्रीज ओव्हरटेक करताना दिप्तीने रनआऊट केले. यामुळे भारताचा विजय झाला. एमसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, दीप्तीचा रनआऊट पूर्णपणे वैध होता. इंग्लंडच्या काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली; परंतु त्यात काहीही चुकीचे नाही. तो रोमांचक सामन्याचा एक असामान्य शेवट होता. पंचांनी योग्य भूमिका बजावली." दरम्यान, यापूर्वीही अनेक प्रसंगी खेळाडूंनी अशाप्रकारे मंकडिंग केले होते. परंतु त्यानंतर आयसीसीने या कृतीला अयोग्य श्रेणीत ठेवले होते. अशा पद्धतीने बाद करणे खेळभावनेच्या विरुद्ध मानले जात होते. आता नव्या नियमांनुसार ते योग्य ठरत आहे

एमसीसीने म्हटले आहे की, नॉन स्टायकर एंडला असलेल्या फलंदाजाला जोपर्यंत गोलंदाजाच्या हातातून चेंडू निघत नाही तोपर्यंत क्रीजवरच थांबणे बंधकारक आहे.

चार्ली डीनला ताकीद दिली होती!

दिप्ती शर्माने सांगितले की, ‘‘इंग्लंडची फलंदाज चार्ली डीन हिला वारंवार सूचना देऊनही तिने ऐकले नाही. चार्ली डीन वारंवार क्रीज सोडत असल्याने आम्ही तिला आधीच ताकीद दिली होती. त्यामुळे आम्ही जे केले ते नियमांनुसार योग्य होते. आम्ही पंचांनाही सांगितले होते. पण तरीही ती थांबली नाही. परिणामी, आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in