दोन दिग्गजांची भेट

स्वित्झर्लंड टुरिझमच्या पुढाकारामुळे एका खास संवाद कार्यक्रमात या दोघांची भेट झाली.
दोन दिग्गजांची भेट

नवी दिल्ली : स्वित्झर्लंडचा टेनससम्राट रॉजर फेडरर आणि भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा या दोन दिग्गजांनी शुक्रवारी एकमेकांची भेट घेतली. सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या नीरजने यावेळी लवकरच भारत जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेचे यजमानपद भूषवेल, असा आशावाद व्यक्त केला.

स्वित्झर्लंड टुरिझमच्या पुढाकारामुळे एका खास संवाद कार्यक्रमात या दोघांची भेट झाली. यावेळी फेडररने नीरजचे कौतुक करतानाच अल्पावधीत त्याने भारतासाठी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे, असे मत व्यक्त केले. तसेच नीरजने पुढील २ ते ३ वर्षात भारताने एखाद्या तरी जागतिक पातळीवर ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करून जगाला आपली ताकत दाखवून द्यावी, असे नीरजने सांगितले. यावेळी नीरजने फेडररला आपली ऑलिम्पिकमधील जर्सी भेट दिली, तर फेडररने नीरजला त्याची रॅकेट भेट म्हणून दिली.

logo
marathi.freepressjournal.in