गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी; ५६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पापुआ गिनीमधील एका फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गिनी सरकारने सोमवारी ही माहिती दिली.
गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी; ५६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Published on

कॉन्क्रे : पापुआ गिनीमधील एका फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गिनी सरकारने सोमवारी ही माहिती दिली.

रविवारी झालेल्या या चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे गिनी सरकारतर्फे सांगण्यात आले. मृत आणि जखमींमध्ये मुलांची संख्या अधिक असल्याचे स्थानिक प्रसार माध्यमे आणि राजकीय पक्षांनी सांगितले.

गिनीचे लष्करी नेते मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ रविवारी दुपारी नॅझरेकोरे येथील स्टेडियममध्ये लेब आणि नॅझरेकोरे या स्थानिक फुटबॉल संघात सामना खेळविला जात होता. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली, असे गिनीचे पंतप्रधान अमाडू ओरी बाह यांनी सांगितले.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गोंधळानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक मुले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हिडीओंमध्ये स्टेडियमच्या एका विभागातील चाहते ओरडताना आणि रेफरीचा निषेध करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये बरेच लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मोठा जमाव दिसत आहे. त्यातील काही जण जखमींना मदत करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in