ACC U19 Asia Cup 2025: कुंडुचे द्विशतक; भारत उपांत्य फेरीत
दुबई : अभिग्यान कुंडूने १२५ चेंडूंत साकारलेल्या २०९ धावांच्या तुफानी खेळीमुळे भारत युवा संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत मलेशियाचा ३१५ धावांनी फडशा पाडला. सलग तिसऱ्या विजयासह भारताने अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरीत धडक मारली. भारताने ४०८ धावांचा डोंगर उभारल्यावर मलेशियाचा संघ ३२.१ षटकांत ९३ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने आगेकूच केली.
आयसीसी अकादमीच्या मैदानात झालेल्या अ-गटातील या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात अमिरातीला ५० षटकांत ७ बाद १९९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पृथ्वी मधू (५०) व उदिश सुरी (नाबाद ७८) यांनी अमिरातीकडून एकाकी झुंज दिली. मध्यमगती गोलंदाज दीपेश देवेंद्रने २ बळी मिळवले. याबरोबरच भारताने अ-गटात २ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. पाकिस्तान सरस धावगतीमुळे अग्रस्थानी आहे. रविवारी भारताची पाकिस्तानशीच दुसऱ्या सामन्यात गाठ पडेल.
पुढील वर्षी १५ जानेवारीपासून नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे १९ वर्षांखालील युवांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी आशियाई खंडातील देशांना सराव व्हावा, या हेतूने दुबईत युवा आशिया चषक खेळवण्यात येत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, अमिराती व मलेशिया अ-गटात, तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेपाळ ब-गटात आहेत. मुंबईच्या १८ वर्षीय आयुष म्हात्रेकडे या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पहिल्या साखळी लढतीत अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने आयुषला (४) स्वस्तात गमावले. मात्र वैभवने तिसऱ्या क्रमांकावरील आरोन जॉर्जसह (६९) दुसऱ्या विकेटसाठी तब्बल २१२ धावांची भागीदारी रचली. वैभवने ९ चौकार व १४ षटकारांची आतषबाजी केली. ३३व्या षटकात वैभव बाद झाल्यावर उपकर्णधार विहान मल्होत्रा (६९), वेदांत त्रिवेदी (३८), अभिग्यान कुंडू (नाबाद ३२) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे भारताने चारशे धावांचा पल्ला गाठला.

