अदानी गुजरात जायंटसचा दर्जेदार युवा खेळाडू घेण्याचा प्रयत्न

युवा खेळाडूंना घेण्यासाठी नव्या कार्यक्रमाची प्रशिक्षक राम मेहर सिंग यांच्याकडून प्रशंसा
अदानी गुजरात जायंटसचा दर्जेदार युवा खेळाडू घेण्याचा प्रयत्न

अहमदाबाद, 9 जुन 2023: प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे आगामी सत्र हे या स्पर्धेचा 10वा मौसम असुन तो संस्मरणीय ठरणार आहे. या वर्षासाठी विविध कार्यक्रमांनी तसेच उत्तम कामगिरीनी हा मौसम साजरा करण्याचा सर्व गुंतवणूक दारांचा निर्धार आहे. याच दिशेने पहिले पाऊल टाकताना अदानी स्पोर्टस लाईन च्या मालकीच्या गुजरात जायंटस संघाने आपले यशस्वी प्रशिक्षक राम मेहर सिंग यांच्या नेतृत्वाखाली नवे खेळाडू संघात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

देशांतील सर्वोत्तम युवा खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी गुजरात जायंटस संघ सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या संघाने चेन्नई आणि नवी दिल्ली येथे निवड चाचण्या आयोजित केल्या असुन अहमदाबाद येथेही निवड चाचणी लवकरच होणार आहे. या चाचण्यांमधून नवे चार युवा खेळाडू मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.

याविषयी बोलताना प्रशिक्षक राम मेहर सिंग म्हणाले की, हेच स्पर्धेत खेळवता येतील असे खेळाडू संघात घेण्याचा गुजरात जायंटस प्रयत्न आहे. त्यातही नवे खेळाडू संघात सामील करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आल्या पासुन प्रथमच अतिशय गुणवान खेळाडू आम्हाला निवडता आले आहेत आणि देशातील कबड्डीच्या विकासासाठी हे चांगले लक्षण आहे.

गुजरात जायंटस संघातील गेल्या वर्षीचा सर्वात यशस्वी खेळाडू परतिक दहिया याने गतवर्षी भरपूर गुण मिळवले होते. नवीन खेळाडू घेण्याच्या कार्यक्रमातूनच परतिक ची निवड करण्यात आली होती. यावर्षी ही निवड चाचणी मधून परतिक सारखेच गुणवान खेळाडू मिळतील असा विश्वास व्यक्त करुन राम मेहर सिंग म्हणाले की, कबड्डी खेळू इच्छिणाऱ्या शेकडो युवा खेळाडूंना या खेळाकडे वळविण्यासाठी हा कार्यक्रम साह्यभूत ठरेल.

गुजरात जायंटस संघाच्या माध्यमातून अदानी उद्योग समूह क्रिडा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत असल्याचे सांगून राम मेहर सिंग म्हणाले की, ते केवळ निकालांना महत्व देत नसून गुजरात मध्ये कबड्डीचा प्रचार व प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करण्याकडे लक्ष द्यावे बाकी सर्व गोष्टींची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना दिला आहे.

प्रशिक्षण पथकातील आपल्या अन्य सहकार्याबरोबर सर्वोत्तम खेळाडू निवडण्यामध्ये प्रशिक्षक राम मेहर सिंग व्यस्त असताना अदानी स्पोर्टस लाईनचे प्रमुख सत्यम त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने त्यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

भारतातील क्रिडा स्पर्धांसाठी देशांतील सर्वोत्तम गुणवान खेळाडूंना करार बद्ध करून त्यांच्यातच गुंतवणुक करण्याचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे, हे सांगुन सत्यम त्रिवेदी म्हणाले की, प्रो कबड्डी लीग साठी आम्ही देशांतील सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षक निवडला आहे आणि त्यांचे निर्णय आम्हाला मान्य असतील. त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आमच्या प्रशिक्षण पथकाला खास आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा करीत असलो तरी अंतिम निर्णय हा प्रशिक्षकाचा असेल. प्रशिक्षक राम मेहर सिंग हे या खेळातील तज्ञ असुन त्यांना आमच्या पेक्षा कबड्डीतील जास्त ज्ञान आहे. त्यामूळे प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी त्यांचा निर्णय अंतिम राहील असे त्रिवेदी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in