
नवी दिल्ली : आगामी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश व अफगाणिस्तानचे संघ जाहीर करण्यात आले आहेत.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. आशिया चषक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत.
दरम्यान, अफगाणिस्तानचे नेतृत्व फिरकीपटू रशिद खान करणार आहे, तर फलंदाज लिटन दास बांगलादेशचा कर्णधार आहे. आता या स्पर्धेची सर्वांना उत्सुकता आहे.
अफगाणिस्तान संघ
राशिद खान (कर्णधार), रहमनुल्ला गुरबाझ, सेदिउल्ला अटल, फवाद मलिक, अझमतुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फझलहक फारुकी, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, परवेझ रसूली, इब्राहिम झादरान, अल्लाह गझनफर, करिम जनत, गुलबदीन नैब, नवीन उल हक.
बांगलादेश संघ
लिटन दास (कर्णधार), तांझिद हसन, जेकर अली, नुरुल हसन, परवेझ होसेन, तौहिद हृदय, मोहम्मद सैफुद्दीन, नुसुम अहमद, रिशाद होसेन, सैफ हसन, तांझिम शकिब, मुस्तफिजूर रहमान, शोरीफुल इस्लाम, अहमद, मेहदी हसन.