आफ्रिकेचा क्लासेन कसोटीतून निवृत्त

२०१९मध्ये रांची येथील कसोटीत क्लासेनने कसोटीत पदार्पण केले होते. मात्र त्याला फक्त ४ कसोटींमध्येच आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करता आले.
आफ्रिकेचा क्लासेन कसोटीतून निवृत्त

प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेन्रीच क्लासेनने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रित करता यावे, या हेतूने ३२ वर्षीय क्लासेनने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

२०१९मध्ये रांची येथील कसोटीत क्लासेनने कसोटीत पदार्पण केले होते. मात्र त्याला फक्त ४ कसोटींमध्येच आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करता आले. गतवर्षी विंडीजविरुद्ध तो अखेरची कसोटी खेळला. ४ कसोटींमध्ये त्याने १३च्या सरासरीने फक्त १०४ धावा केल्या. भारताविरुद्ध नुकताच झालेल्या कसोटी मालिकेसाठी क्लासेनला वगळण्यात आले होते.

“आफ्रिकेच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करता आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचार केल्यानंतर मी कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी हा नेहमीच माझा आवडता फॉरमॅट असेल. मात्र भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय घेणे योग्य आहे,” असे क्लासेन म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in