मिताली राजनंतर आता या महिला क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

धरने २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते
मिताली राजनंतर आता या महिला क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनंतर आता रुमेली धरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून १५ वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा केले.

धरने २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. रुमेली धरने भारतासाठी चार कसोटी, ७८ एकदिवसीय आणि १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत रुमेली धरने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना इंस्टाग्रामवर रुमेली धरने लिहिले की, पश्चिम बंगालमधून सुरू झालेली माझी २३ वर्षांची वाटचाल अखेर संपली. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणे आणि २००५ च्या अंतिम फेरीत पोहोचणे माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय होते. बीसीसीआय आणि सहकारी खेळाडूंनी केलेल्या सहकार्याबद्दल मी या संधीचे आभार मानत आहे.

धरने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी डी-२० मालिकेत खेळला होता. रुमेलीने कसोटी क्रिकेटमध्ये २९.५० च्या सरासरीने २३६ धावा केल्या आणि २१.७५ च्या सरासरीने आठ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने १९.६१ च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह ९६१ धावा केल्या. याशिवाय तिने २७.३८ च्या सरासरीने ६३ विकेट्स घेतल्या. रुमेलीने १८.७१ च्या सरासरीने १३१ धावा केल्या आणि २३.३० च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या. शिवाय, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाबाद ६६ धावा केल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in