भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण, सूर्यकुमार यादवनंतर रोहित शर्माही जायबंदी!

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू जायबंदी होताना दिसत आहेत. त्यामुळे काही दिवसांनी टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर जाणाऱ्या भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण, सूर्यकुमार यादवनंतर रोहित शर्माही जायबंदी!

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू जायबंदी होताना दिसत आहेत. त्यामुळे काही दिवसांनी टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर जाणाऱ्या भारतीय संघाची चिंता वाढली आहे. या स्पर्धेसाठी जाणारा संपूर्ण संघ १०० टक्के फिट नसल्याचे समजते. त्यात आता कर्णधार रोहित शर्माची भर पडली आहे.

कोलकाताविरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला मुख्य संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र नंतर हार्दिक पंड्याने त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर उतरवले. रोहितच्या पाठीत चमक भरल्याचे पीयूष चावलाने सामना संपल्यानंतर सांगितले. फक्त रोहितच नव्हे तर भारतीय संघात निवड झालेल्यांपैकी अनेक खेळाडू तंदुरुस्त नसल्याचे समजते. जगातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू समजल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही मुंबई इंडियन्सने पूर्ण संधी दिलेली नाही. तो १०० टक्के फिट नसल्यामुळेच त्याला अधूनमधून मैदानावर परतण्याची संधी देण्यात येते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सूर्यकुमारच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण त्यानंतरही त्याला हार्नियाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. शिवम दुबे हासुद्धा रणजी करंडकाच्या शेवटच्या टप्प्यात खेळू शकला नव्हता. चेन्नई सुपर किंग्जसाठी तो इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तो गोलंदाजीसाठी उपलब्ध होत नाही. भारतीय संघाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची उणीव टी-२० वर्ल्डकपदरम्यान जाणवणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in