पूरन, मार्करमची वादळी खेळी; लखनऊचा गुजरातवर ६ विकेट राखून विजय

निकोलस पूरन आणि एडीन मार्करम यांच्या वादळी अर्धशतकांच्या बळावर लखनऊने गुजरात जायंट्स विरुद्ध ६ विकेट राखून सोपा विजय मिळवला.
पूरन, मार्करमची वादळी खेळी; लखनऊचा गुजरातवर ६ विकेट राखून विजय
IPL/X
Published on

लखनऊ: निकोलस पूरन आणि एडीन मार्करम यांच्या वादळी अर्धशतकांच्या बळावर लखनऊने गुजरात जायंट्स विरुद्ध ६ विकेट राखून सोपा विजय मिळवला.

पूरन (३४ चेंडूंत ६१ धावा) आणि मार्करम (३१ चेंडूंत ५८ धावा) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २९ चेंडूंत ५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १८१ धावांचे लक्ष्य लखनऊने १९.३ षटकांत पूर्ण केले.

कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने १२० धावांची शानदार भागीदारी केली. मात्र ही दुकली बाद झाल्यानंतर लखनऊच्या आक्रमणापुढे गुजरातने निर्धारित २० षटकांत ६ फलंदाज गमावून १८० धावा केल्या. सुदर्शनच्या ३७ चेंडूंत ५६ धावा आणि गिलच्या ३८ चेंडूंत ६० धावा यामुळे गुजरातने चांगली सुरुवात केली. मात्र लखनऊने शानदार गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. झटपट ३ फलंदाजांना माघारी धाडत गुजरातच्या धावगतीचा वेग कमी केला.

चांगल्या सलामीनंतरही गुजरातला शेवटच्या ८ षटकांत केवळ ६० धावाच करता आल्या. मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेला लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने १८ चेंडूंत २१ धावा जमवल्या. पंतची विकेट गमावण्यापूर्वी लखनऊने पॉवरप्लेमध्ये ६१ धावा जमवल्या.

पंत बाद झाल्यानंतर मार्करमने पूरनच्या साथीने लखनऊचा डाव पुढे नेला. फिरकीपटू साई किशोरने यंदाच्या हंगामात प्रभावी गोलंदाजी केली आहे. मात्र मार्करम आणि पूरनने त्याला लक्ष्य केले. पूरनने ३ दणदणीत षटकार लगावत साई किशोरच्या पहिल्याच षटकात २४ धावा जमवल्या.

१२व्या षटकात आणखी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मार्करम शुभमन गिलकडे झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावले. पूरनने स्क्वेअर लेगच्या दिशेने जोरदार फटकेबाजी करत एक चौकार आणि सात षटकार मारून त्याची खेळी सजवली.

ठळक मुद्दे

पूरनने २३ चेंडूंत त्याचे अर्धशतक झळकावले. हंगामातील पूरनचे हे चौथे अर्धशतक ठरले. राशीदच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केल्यानंतर पूरनने मोहम्मद सिराजला लक्ष्य केले. १३ व्या षटकात त्याने सिराजला एका चौकार आणि एक षटकार लगावला.

लखनऊने पॉवरप्लेमध्ये बिनबाद ६१ धावा जमवल्या. मार्करम आणि पंत या सलामीवीरांनी गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धावांची गती चांगली राहिल्याने लखनऊला विजय मिळवणे सोपे गेले.

logo
marathi.freepressjournal.in