राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अजय सिंहचे कांस्यपदक हुकले

अजय सिंहला स्नॅच राऊंडमध्ये १४३ किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १७६ किलो वजन उचलण्यात यश आले
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अजय सिंहचे कांस्यपदक हुकले

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारी चौथ्या दिवशी वेटलिफ्टिंगच्या ८१ किलो वजनी गटात अजय सिंहचे कांस्यपदक अवघ्या एक किलोने हुकले.

अजय सिंहला स्नॅच राऊंडमध्ये १४३ किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १७६ किलो वजन उचलण्यात यश आले; मात्र पदकासाठीचे त्याचे प्रयत्न तोकडे पडले. अजय ३१९ किलो वजन उचलत चौथ्या स्थानावर राहिला.

क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात अजय सिंहने पहिल्या प्रयत्नात अजय सिंहने १७२ किलो वजनासह एकूण ३१५ किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने १७६ किलो वजन उचलून एकूण वजन ३१९ किलो पर्यंत नेले; मात्र इंग्लंडच्या मुरीने १७८ किलो वजन उचलून आपली आघाडी कायम ठेवली. अजय दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ख्रिस मुरीने १८१ किलो वजन उचलून विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकावर नाव कोरले; मात्र तिसऱ्या प्रयत्नात अजय सिंहला १८० किलो वजन उचलण्यात अपयश आले.

सुवर्णपदक विजेत्या ख्रिस मुरीने एकूण ३२५ किलो वजन उचलून गेम रेकॉर्ड केले. कांस्यपदक जिंकणाऱ्या कॅनडाच्या निकोलस वॅकहोनने एकूण ३२० किलो वजन उचलले.

दरम्यान, सोमवारी पुरुष हॉकी संघाचा सामना इंग्लंडशी झाला. टेबल टेनिसमध्ये पुरुष संघ उपांत्य फेरीत नायजेरियाशी भिडल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in