मैदानाशी घट्ट नाते असल्यामुळेच MCA सर्वोत्तम! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे विधान; नवशक्ति विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) म्हणजेच भारतीय क्रिकेटमधील एक महासत्ता. या संघटनेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक रथीमहारथी आतुर असतात. मात्र हे पद मिळवल्यावर ते टिकवणे व त्यानुसार निर्णय घेऊन क्रिकेट व खेळाडूंच्या दृष्टीने फलदायी निर्णय घेणे हे तितकेच कठीण. एमसीएच्या इतिहासातील सर्वात युवा अध्यक्ष ठरलेला अजिंक्य नाईक मात्र गेली जवळपास दोन वर्षे ही भूमिका चोखपणे बजावत आहेत.
मैदानाशी घट्ट नाते असल्यामुळेच MCA सर्वोत्तम! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे विधान; नवशक्ति विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य
मैदानाशी घट्ट नाते असल्यामुळेच MCA सर्वोत्तम! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे विधान; नवशक्ति विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य
Published on

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) म्हणजेच भारतीय क्रिकेटमधील एक महासत्ता. या संघटनेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक रथीमहारथी आतुर असतात. मात्र हे पद मिळवल्यावर ते टिकवणे व त्यानुसार निर्णय घेऊन क्रिकेट व खेळाडूंच्या दृष्टीने फलदायी निर्णय घेणे हे तितकेच कठीण. एमसीएच्या इतिहासातील सर्वात युवा अध्यक्ष ठरलेला अजिंक्य नाईक मात्र गेली जवळपास दोन वर्षे ही भूमिका चोखपणे बजावत आहेत. मैदानाशी घट्ट नाते असल्यामुळेच आपण तसेच एमसीएने इथवर मजल मारली असल्याचे मत त्यांनी 'नवशक्ति' वृत्तसमुहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

अजिंक्य यांनी नवशक्ति आणि फ्री प्रेस जर्नल वृत्तसमुहाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी एमसीएने गेल्या काही वर्षांत राबवलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी मुक्त भाष्य केले. तसेच भविष्यातील आव्हानांचा विचार करता एमसीएने आखलेल्या योजनांचीही अजिंक्य यांनी कल्पना दिली. त्यांच्याशी क्रिकेटसह अन्य रंगतदार मुद्द्यांवर केलेल्या खास बातचीतमधील काहीसा भाग 'नवशक्ति' च्या वाचकांसाठी आज प्रकाशित करण्यात येत आहे. सविस्तर मुलाखत नवशक्तिच्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे.

एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे जून २०२४मध्ये अचानक निधन झाल्यामुळे त्यावेळी सचिव पदावर कार्यरत असलेले अजिंक्य निवडणुकीत विजयी होत अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हापासून त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रम एमसीएने राबवले आहेत.

दोन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचे यशस्वी नेतृत्व करणारा मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्या नावे स्टैंड, माजी क्रिकेटपटूंचे विविध प्रवेशद्वारांना नाव, तसेच महिलांसाठी टी-२० मुंबई लीगची संलग्न क्लब्सला प्रत्येक सामन्यासाठी दिले जाणारे मानधन, शालेय वयोगटातील मुलांसाठी विशेष रेल्वे पासची सुविधा, क्रीडा पत्रकारांसाठी 'ऑनर्स बोर्ड', मुंबईच्या महिला कर्णधारांसाठी बीकेसी येथे विशेष भिंत आणि सर्वात लक्षणीय म्हणजेच शरद पवार क्रिकेट संग्रहालय. ही यांपैकीच काही उदाहरणे.

एमसीएला काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघटनेचा पुरस्कार देण्यात जुलैमध्येच एकत्रित येतात. मी स्वतः एकेकाळी शालेय स्तरावर क्रिकेट खेळलो असल्याने मला खेळाडूंची स्थिती व त्यांच्यापुढील संकटे ठाऊक आहेत. या सर्वांशी माझे घट्ट नाते असल्याने त्याचा आपसुकच एमसीएला लाभहोतो," असे अजिंक्य म्हणाले.

त्याशिवाय शालेय वयोगटातील खेळाडूंना अनेकदा दैनदिन खर्चासाठी पैसे नसतात. त्यामुळेच एमसीएने त्यांच्यासाठी विशेष रेल्वे पासची सुविधा सुरू केली आहे. तसेच त्यांच्या खाण्याचा भारही एमसीए वाहत आहे. याविषयी विचारले असता अजिंक्य म्हणाले की, "मी स्वतः जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हाची परिस्थिती व आताची स्थिती बदलली आहे. ठाणे-पालघर येथून मुले मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करतात. मात्र हे अनेकदा खर्चीक असते. क्रिकेटच्या किटचा खर्चही असतो. अशा वेळी सर्वच पालक हा खर्च झेलू शकत नाहीत. त्यामुळेच एमसीएने अशा खेळाडूंसाठी विशेष रेल्वे पासची सुविधा सुरू केली आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी मुंबईत लवकरच १ लाख प्रेक्षकक्षमता असलेले स्टेडियम बांधण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याविषयी विचारले असता एमसीएने यासाठी २-३ जागांची पाहणी केली असल्याचे अजिंक्य यांनी सांगितले.

"शासनाने एमसीएला नेहमीच पाठिंबा दिला आहे. विविध खेळाडूंच्या नावाचे प्रवेशद्वार लोकापर्ण लवकरच होईल. स्टेडियमसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच शरद पवार क्रिकेट संग्रहालय हे युवा पिढीसाठी आदर्श ठरत आहेत. आपल्या मुलांना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव है माहिती आहेतच. मात्र सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, डायना एडल्जी यांच्याविषयी त्यांना माहिती मिळावी. मुंबई क्रिकेटचा वारसा किती समृद्ध आहे, हे त्यांना समजावे, या हेतूनेच आपण हे संग्रहालय सुरू केले आहे," असे अजिंक्य यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती ठासून भरलेली आहे, असेही ते म्हणाले. तसेच वयचोरी रोखण्यासाठी एमसीए सातत्याने पाऊल उचलत असल्याने हे प्रमाण कमी झाले असल्याचे अजिंक्य यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in