अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष? दिल्ली संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधान

२०२१ साली देखील भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अजित आगरकर याच्या नावाची चर्चा होती
अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष? दिल्ली संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधान

भारतीय संघातील माजी अष्टपैलू खेळाडू म्हणू ओळख असलेला अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित आगरकर या निवड समितीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात त्याने आज दिल्ली संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने या चर्चा अधिक जोर धरु लागल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीची धुरा ही चेतन शर्मा यांच्याकडे आहे. मात्र निवड समितीला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. बीसीसीआयने त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली असून अर्ज मागवले आहेत. मागील दोन दिसांपूर्वी भारताचा आघाडीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग याच्या देखील नावाची या पदासाठी जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, त्यांने एका वृत्तवाहिनीशी बोलताना या वृत्ताचे खंडन करत चर्चांना पूर्ण विरान दिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अजित आगरकर हा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त आलेलं नाही. पण अजित आगरकर याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. अजित आगरकरने आतापर्यंत २६ कसोटी सामने, १९१ वन डे आणि ४ टी २० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तसंच त्याने ४२ आयपीएलचे सामने देखील खेळले आहेत. आज दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे अजित आगरकर याला गुडबाय म्हटलं गेलं आहे. त्यामुळे निवड समितीचा अध्यक्ष होण्याची त्याच्या नावाची शक्यता बळावली आहे.

२०२१ साली देखील भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अजित आगरकर याच्या नावाची चर्चा होती. त्यावेळी त्याने मुलाखत देखील दिली होती. मात्र, त्यावेळी चेतन शर्मा यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती. अजित आगारकर हा रमाकांत आचरेकर यांचा शिष्य असून त्याने २६ कसोटी सामन्यात ५७१ धावा करत ५९ विकेट घेतल्या आहेत. तर १९१ वन डे सामन्यात २८८ विकेट घेत १२६९ धावा चोपल्या आहेत. तसंच त्याने टी २० मध्ये देखील ३ विकेट घेतल्या आहेत. त्याने खेळलेल्या ४२ आयपीएलच्या सामन्यात २९ विकेट घेतल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in