ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या अलिझा, भव्यश्रीला सुवर्णपदक,खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा

अलिझा मुल्लाने १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक काबिज केले. त्याशिवाय भव्यश्री महल्लेने पदार्पणातच ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या अलिझा, भव्यश्रीला सुवर्णपदक,खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा

चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ॲथलेटिक्समध्ये पहिल्याच दिवशी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली. अलिझा मुल्लाने १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक काबिज केले. त्याशिवाय भव्यश्री महल्लेने पदार्पणातच ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याशिवाय आर्य कंदकुमार व संदीप गोंड यांनी अनुक्रमे लांब उडी व ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदकांची कमाई केली.

चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अलिझाने १४ सेकंदांत १०० मीटर अंतर गाठले. ती मुंबईच्या वझे महाविद्यालयात शिकत आहे. दुसरीकडे नागपूरच्या १७ वर्षीय भव्यश्रीने १० मिनिटे, १३.५२ सेकंदांत ३,००० मीटर अंतर गाठून सुवर्णपदक पटकावले. शेवटचे १२० मीटर बाकी असताना चौथ्या क्रमांकावर असूनही भव्यश्रीने सरशी साधली.

logo
marathi.freepressjournal.in