महिलांच्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; श्रीलंकेत १९ जुलैपासून रंगणार स्पर्धा

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, युएई, मलेशिया नेपाळ आणि थायलँड हे संघ असतील. २०२२च्या आशिया चषकात सात, तर २०१८च्या आशिया चषकात सहा संघांचा समावेश होता.
महिलांच्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; श्रीलंकेत १९ जुलैपासून रंगणार स्पर्धा

नवी दिल्ली : महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा व वेळापत्रक आशियाई क्रिकेट परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. १९ ते २८ जुलै यादरम्यान श्रीलंकेतील दाम्बुला या ठिकाणी महिला आशिया चषकाचे सर्व सामने खेळले जातील. भारत-पाकिस्तान या स्पर्धेत एकाच गटात असतील.

यावर्षी एकूण आठ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, युएई, मलेशिया नेपाळ आणि थायलँड हे संघ असतील. २०२२च्या आशिया चषकात सात, तर २०१८च्या आशिया चषकात सहा संघांचा समावेश होता. ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून भारत, पाकिस्तान, यूएई व नेपाळ हे अ-गटात, तर बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया व थायलंड हे ब-गटात असतील. भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत २० जुलै रोजी होईल. २६ जुलैला उपांत्य, तर २८ जुलैला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in