अष्टपैलू मुशीर खानमुळे सीसीआयचे जबरदस्त कमबॅक :पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धा 

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा व्हिक्टरी सीसीची अवस्था ६ बाद ८६ धावा अशी झाली. पहिल्या डावात अजूनही ते ९१ धावांनी पिछाडीवर आहेत
अष्टपैलू मुशीर खानमुळे सीसीआयचे जबरदस्त कमबॅक :पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धा 

मुंबई : मुशीर खानच्या (४१ धावा आणि ४ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) यूपीएल-७६व्या पोलीस ढाल आमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या दोनदिवसीय उपांत्य फेरीत व्हिक्टरी क्रिकेट क्लबविरुद्ध जबरदस्त पुनरागमन केले.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा व्हिक्टरी सीसीची अवस्था ६ बाद ८६ धावा अशी झाली. पहिल्या डावात अजूनही ते ९१ धावांनी पिछाडीवर आहेत. व्हिक्टरी सीसीकडून जय बिश्तने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तत्पूर्वी, पी. जे. हिंदू जिमखाना मैदानावर ध्रुमिल मटकर आणि मुशीर खान यांच्या अनुक्रमे ४६ आणि ४१ धावांमुळे सीसीआयने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावांची मजल मारली. अथर्व अंकोलेकरने ४७ धावांत ४ विकेट मिळवले.

दरम्यान, मरिन ड्राईव्ह येथील मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पी. जे. हिंदू जिमखानाविरुद्ध न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचा पहिला डाव १९० धावांत आटोपला. सिद्धांत अधटरावने सर्वाधिक ७२ धावा केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in