भारत-पाकिस्तान सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री पूर्ण

काही आठवड्यांपूर्वीच आयसीसीने स्टेडियममध्ये उभे राहून सामना पाहण्यासाठीही तिकिटांची सुविधा उपलब्ध केली होती
भारत-पाकिस्तान सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री पूर्ण

भारत-पाकिस्तान यांच्यात मेलबर्न येथे २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-१२ सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केले.

काही आठवड्यांपूर्वीच आयसीसीने स्टेडियममध्ये उभे राहून सामना पाहण्यासाठीही तिकिटांची सुविधा उपलब्ध केली होती. त्या चार हजार तिकिटांसह आसनक्षमतेची एकूण ५४ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. नुकताच झालेल्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान या दोघांनीही एकमेकांना प्रत्येकी एकदा हरवले होते. तसेच गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताला धूळ चारली होती. आता पुन्हा एकाच गटात हे संघ आल्यामुळे यावेळी भारत पाकिस्तानला नमवून अभियानाचा विजयारंभ करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यासाठीही प्रेक्षकांनी अतिरिक्त तिकिटांची मागणी केली असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in