आता माघार नाही! चेन्नई सुपरकिंग्जच्या 'या' स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

अंबाती रायडूने आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.
आता माघार नाही! चेन्नई सुपरकिंग्जच्या 'या' स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील महाअंतिम सामाना होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या सामान्याचा थरार रंगणार आहे. मात्र, चेन्नई सुपरकिंग्जला या सामन्यापूर्वी मोठ्या धक्का बसला आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार खेळाडू अंबाती रायडू याने मोठी घोषणा केली आहे. अंबाती रायडूने आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आज चेन्नई आणि गुजरात संघ आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील शेवटच्या सामन्यात भिडणार आहेत. या सामन्याआधीच अंबाती रायडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आजचा सामना त्याचा अंतिम सामना असल्याचे तो म्हणाला आहे.

निवृत्तीबाबतचे ट्विट करताना तो म्हणाला की, "मुंबई आणि चेन्नई या दोन महान संघासाठी खेळलो. 204 सामने, 14 सिझन, 11 प्ले ऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आज रात्री सहावी जिंकण्याची आशा आहे." असे त्याने म्हटले आहे. तसेच याबाबत पुढे त्याने लिहले की, "हा प्रवास खुप मोठा होता. आजच्या आयपीएलचा अंतिम सामना माझा शेवटचा सामना असेल असा निर्णय अंबाती रायडूने घेतला आहे. या स्पर्धेत खेळताना मला खुप मजा आली. तुम्हा सर्वांचे आभार. आता कोणताही यु-टर्न नाही". असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in