जडेजाच्या पर्यायाबाबत संदिग्धता कायम

राहुल द्रविड ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मालिकेत मधली फळी मजबूत करण्यासाठी प्रयोग करणार का, हा आता गहन प्रश्न झाला
जडेजाच्या पर्यायाबाबत संदिग्धता कायम

गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेला रवींद्र जडेजा विश्वचषक खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच, भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. त्यानंतर टीम इंडिया टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मालिकेत मधली फळी मजबूत करण्यासाठी प्रयोग करायचे की नाही, हा व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यापुढील यक्षप्रश्न आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मालिकेत मधली फळी मजबूत करण्यासाठी प्रयोग करणार का, हा आता गहन प्रश्न झाला आहे.

आशिया चषक २०२२ मध्ये भारताने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले; परंतु सुपर-४ टप्प्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून मोठा पराभव झाला. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले. या आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाचे प्रयोग सुरूच राहिले. सलामीला विराट कोहलीला संधी देण्यात आली. मधल्या फळीत ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचाही प्रयोग केला. मात्र, यामध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीने संघात चिंता निर्माण झाली. जडेजा विश्वचषक खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसतानाही त्याला पर्यायही संघाला मिळू शकलेला नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ भारतदौऱ्यावर २० सप्टेंबरपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघही भारतदौऱ्यावर येणार आहे. तीन दिवसांच्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय मालिका खेळावी लागणार आहे.

यानंतर भारतीय संघाला पाच दिवसांचा ब्रेक मिळेल. त्यानंतर संघाला त्याला टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे. १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दोन सराव सामने होणार आहेत. टी-२० विश्वचषकात भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर राेजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in