जेमिमा रॉड्रिग्जची उणीव जाणवेल - अमोल मुझुमदार

महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
जेमिमा रॉड्रिग्जची उणीव जाणवेल - अमोल मुझुमदार
जेमिमा रॉड्रिग्जची उणीव जाणवेल - अमोल मुझुमदार
Published on

दुबई : महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तरीही, आशिया चषक आणि सप्टेंबरपासून जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज आणि भुकेला असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी व्यक्त केले आहे.

“भारतीय महिला क्रिकेट संघ विशेष आहे, खेळाडू यश मिळवण्यासाठी आणि स्पर्धा जिंकण्यासाठी भुकेल्या आहेत,” असे मुझुमदार यांनी सांगितले. आशिया चषक स्पर्धेत भारत अ-गटात थायलंड, हाँगकाँग, चीन आणि पाकिस्तानसोबत आहे.

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडलेली जेमिमा सध्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. मुझुमदार म्हणाले, “जेमिमा ही आमची महत्त्वाच्या प्रसंगी धावून येणारी खेळाडू आहे.

तिची उणीव नक्कीच भासेल, परंतु तिचे पूर्ण तंदुरुस्त होणे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. संघात आलेल्या नव्या खेळाडूही नक्कीच चांगली कामगिरी करतील.”

जेमिमा ही भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी चौथी फलंदाज असून, तिने १३१ सामन्यांतील ११८ डावांत २९.४१ च्या सरासरीने २,८२४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in