रोहितकडून मावळते प्रशिक्षक द्रविड यांना भावनिक निरोप

रोहित-द्रविड जोडीने भारताचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने रोहितने काही छायाचित्रही पोस्ट केले.
रोहितकडून मावळते प्रशिक्षक द्रविड यांना भावनिक निरोप

मुंबई : भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारताचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी इन्स्टाग्रामवर विशेष पोस्ट टाकून भावनिक निरोप दिला. रोहित-द्रविड जोडीने भारताचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने रोहितने काही छायाचित्रही पोस्ट केले.

“माझ्या लहानपणापासून अनेकांप्रमाणे तुम्हाला पाहत तुमचा आदर्श घेत मोठा झालो आहे. पण तुमच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. तुम्ही या खेळाचे मोठे दिग्गज आहात. परंतु, तुम्ही तुमचं सगळं कर्तृत्व, लोकप्रियता बाजूला ठेऊन भारतीय संघाचे प्रशिक्षक झालात आणि तुम्ही इतकं खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलंत की आम्ही कोणीही अगदी कितीही मजा मस्करी तुमच्यासोबत सहज करत होतो.

माझी पत्नी तुम्हाला मस्करीत वर्क वाईफ म्हणते आणि तुम्हाला या नावाने हाक देता येते यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुमच्या देदीप्यमान कारकीर्दीत विश्वचषकाने तुम्हाला हुलकावणी दिली होती. तुमच्या बरोबर विश्वचषक पटकावता आला याचा अतीव आनंद आणि समाधान आहे,” असे रोहित म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in