आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा,हार्दिक पंड्या कर्णधार

या दौऱ्यात राहुल त्रिपाठीला संधी देण्यात आली
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा,हार्दिक पंड्या कर्णधार

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून हार्दिक पंड्याच्या खांद्यावर नेतृत्त्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार उपकर्णधारपदाची जबाबदारी वाहणार आहे. या दौऱ्यात राहुल त्रिपाठीला संधी देण्यात आली आहे.

संघात सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन परतले आहेत. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीचा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

सध्या ऋषभ पंत भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र तो इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले की, राहुल अजून दुखापतीतून सावरलेला नाही. भारतीय कसोटी संघ मुंबईहून मध्यरात्री इंग्लंडला रवाना होत आहे. राहुल त्यांच्याबरोबर जाणार नाही. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. तो या आठवड्याच्या शेवटची फिटनेस टेस्ट देण्याची शक्यता आहे. तो लवकर दुखापतीतून सावरण्याची शक्यता दिसत नाही.

ऋषभ पंत वगळता इतर खेळाडू गुरूवारी पहाटे इंग्लंडसाठी रवाना होतील. इंग्लंडमध्ये १ ते ५ जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना होणार आहे. हा सामना २०२१ च्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळी स्थगित ठेवण्यात आला होता.

सूत्रांनी सांगितले की, शुभमन गिलने अनेक कसोटी सामन्यात सलामी दिली आहे. याचबरोबर चेतेश्वर पुजारा देखील सलामीला खेळू शकतो. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तरी १७ सदस्यांचा संघ निवडल्याने त्यातील १६ खेळाडू जातील त्यामुळे रिप्लेसमेंट हा काही मोठा विषय नाही.

भारताचा टी-२० संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in