वेलकम लिटिल चॅम्प! पुत्रप्राप्तीनंतर विराट-अनुष्काला सचिन तेंडुलकरने दिल्या खास शुभेच्छा

संपूर्ण क्रिकेटविश्वातून विरुष्कावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसंच सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या पोस्टचीही तुफान चर्चा सुरु आहे.
Virat-Anushka, Sachin Tendulkar
Virat-Anushka, Sachin Tendulkar

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माला पुत्रप्राप्ती झाली असून सोशल मीडियावर विरुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'व्हॅलेंटाईन'डे'ची सांगता होताच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारीला अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला. अनुष्काने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली असून या बाळाचं नाव 'अकाय' असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. ही गोड बातमी समोर येताच संपूर्ण क्रिकेटविश्वातून विरुष्कावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसंच सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या पोस्टचीही तुफान चर्चा सुरु आहे.

सचिनने एक्सवर विरुष्काला शुभेच्छा देताना म्हटलंय, अकायच्या आगमनाने तुमच्या सुंदर कुटुंबात आनंदाची मोहोर उमटली आहे. त्याच्या नावाप्रमाणेच घरातील सौंदर्यही उजाळून निघालं आहे. अकाय तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणेल, अशी आशा करतो. लिटिल चॅम्पचं या जगात स्वागत.

इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने विश्रांती घेतलीय. विराट काही दिवसांपासून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराट-अनुष्काला दुसरं अपत्य होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून १५ फेब्रुवारीला अकायचा जन्म झाल्याचं अनुष्काने सोशल मीडियावर जाहीर केलंय. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच २० तारखेला अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली.

"तुम्हा सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की, १५ फेब्रुवारीला वामिकाचा छोटा भाऊ अकायचं या जगात आगमन झालंय. आम्ही त्याचं स्वागत करतो. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांनी आमचं कुटुंब आनंदाने बहरून निघावं. आमच्या खासगी आयुष्याचा कृपया आदर ठेवा," असं अनुष्काने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in