एफआयसीए मध्ये भारतीय वंशाच्या या महिलेची अध्यक्षपदी नेमणूक

लिसा या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सची (एफआयसीए) पहिल्या महिला अध्यक्ष ठरली आहे.
एफआयसीए मध्ये भारतीय वंशाच्या या महिलेची अध्यक्षपदी नेमणूक

ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार असलेल्या भारतीय वंशाच्या आणि पुण्यात जन्मलेल्या लिसा स्थळेकर यांची फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. लिसा या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सची (एफआयसीए) पहिल्या महिला अध्यक्ष ठरली आहे.

स्वित्झर्लंडमधील नियॉन येथे झालेल्या एफआयसीए कार्यकारी समितीच्या बैठकीत ४२ वर्षीय लिसा यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. लिसा यांच्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू जिमी अॅडम्स आणि इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी हे पद भूषविलेले आहे.

फुटबॉलनंतर क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आयलियन अॅश, शार्लोत एडवर्ड, मिताली राज, सारा टेलर, अंजुम चोप्रा, बेट्टी विल्सन आणि लिसा स्थळेकर या महिला क्रिकेटपटूंनी मुलीदेखील तितक्याच ताकदीने क्रिकेट खेळू शकतात, हे सिद्ध करून दाखविले आहे. यांच्यापैकी एकीने आता आणखी एक इतिहास रचला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in