अर्जेंटिनाने एस्टोनियावर ५-०ने विजय मिळविला

अर्जेंटिनाने एस्टोनियावर ५-०ने विजय मिळविला

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाने एस्टोनियावर ५-०ने विजय मिळविला. या सामन्यातील सर्व गोल मेस्सीने केले. मेस्सीने कारकीर्दीत दुसऱ्यांदा एका सामन्यात हॅट‌्ट्रिकसह पाच गोल करण्याची किमया केली.

सामन्यातील पहिला गोल पेनल्टीद्वारे झाला. ३१व्या मिनिटाला मिळालेल्या या पेनल्टीचे मेस्सीने गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर त्याने आणखी चार गोल केले. हाफ टाईमपूर्वी त्याने संघाची आघाडी दुप्पट केली. त्याने हाफ टाईमनंतर लगेचच गोल करून स्कोअर ३-० असा केला. ७१व्या आणि ७४व्या मिनिटाला गोल करत संघाला ५-० असा विजय मिळवून दिला.

याआधी त्याने २०१२मध्ये चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मन क्लब बेयर लेव्हरकुसेनविरुद्ध पाच गोल केले होते. चॅम्पियन्स लीगमध्ये खेळाडूने पाच गोल करण्याची ती पहिलीच वेळ होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in