अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ केरळात येणार? १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान सामना होण्याची शक्यता

जगज्जेता अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ फिफा फ्रेंडली सामन्याकरिता नोव्हेंबर महिन्यात केरळ येथे येणार असून हा सामना १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. स्वतः अर्जेंटिनाच्या संघाने ही माहिती दिली.
अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ केरळात येणार? १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान सामना होण्याची शक्यता
Photo : X
Published on

कोची : जगज्जेता अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ फिफा फ्रेंडली सामन्याकरिता नोव्हेंबर महिन्यात केरळ येथे येणार असून हा सामना १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. स्वतः अर्जेंटिनाच्या संघाने ही माहिती दिली.

लिओनेल स्कॅलोनी याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा राष्ट्रीय संघ यंदाच्या वर्षात २ फिफा फ्रेंडली सामने खेळणार आहेत. त्यातील पहिला सामना ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान युएस येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ आणि स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित नाही, अशी माहिती अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

दुसरा फिफा फ्रेंडली सामना १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान लाऊंडा, अंगोला आणि केरळ येथे होण्याची शक्यता आहे. या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ अद्याप निश्चित नाही. केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुररहिमान यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.

लिओनेल मेस्सी आणि त्याचा संघ नोव्हेंबर २०२५ मध्ये केरळ येथे सामना खेळणार असल्याचे मंत्री व्ही. अब्दुररहिमान यांनी सांगितले.

भारतीय चाहत्यांचे आभार!

फ्रान्सला पराभूत करून २०२२ चा फिफा विश्वचषक उंचावल्यानंतर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने केरळमधील त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले होते.

logo
marathi.freepressjournal.in